मुंबई : तुरुंगात असूनही आमदार रमेश कदम यांची मुजोरी कमी झालेली नाही. रमेश कदम यांनी जेलमध्ये पोलिसांवर दादागिरी करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

रुटीन चेकअपसाठी रमेश कदम यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात नेलं जात होतं. मात्र कदम रुग्णालयात जाण्यास तयार नव्हते. यावेळी पोलिसांनी व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. तसंच पोलिस अधिकाऱ्याने रमेश कदम यांचं म्हणणं लिहून घेण्यास सांगितलं.

त्यानंतर रमेश कदम यांनी पोलिसांवर दादागिरी करत शिवीगाळ केली. इतकंच नाही तर पोलिसांना धमकीही दिली.

दरम्यान, अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम अटकेत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित केलं.

काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा?
अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला आहे.

- कोणतीही प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरती
- उस्मानाबादच्या नेटकेंनी मुलाला, बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं
- नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्ज उपलब्ध करुन दिलं. त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले.
- अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या
- लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले
- महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला 5 कोटी कागदोपत्र वाटण्यात आले
- विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटल्याचा आरोप

पाहा व्हिडीओ





आमदार रमेश कदम यांची 135 कोटींची संपत्ती जप्त करा : कोर्ट


By:अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | Last Updated: Friday, 10 March 2017 4:31 PM





मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. रमेश कदम यांची 135 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने दिले आहे.

सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे अन्वेषण विभाग रमेश कदम यांची एकूण 135 कोटी 16 लाख 82 हजार 608 रुपयांची मालमत्ता जप्त करणार आहे. यात शेती, प्लॉट, कपेडर रोड येथील प्लॉट, औरंगाबाद इथली मालमत्ता आणि 20-25 बँक अकाऊंट, अशा एकूण 54 मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायमूर्ती टंकीवाला यांनी दिले आहेत.

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी आमदार रमेश कदम सध्या अटकेत असून, त्यांनी 400 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचे म्हटलं जात आहे. पुणे-नगर रस्त्यावरील ग्रँण्ड ह्यात या पंचतारांकित हॉटेलमधून सीआयडीच्या पथकाने त्यांना अटक केली.

काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा?

अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला आहे.

  • कोणतीही प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरती

  • उस्मानाबादच्या नेटकेंनी मुलाला, बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं

  • नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्ज उपलब्ध करुन दिलं. त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले.

  • अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या

  • लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले

  • महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला 5 कोटी कागदोपत्र वाटण्यात आले

  • विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटल्याचा आरोप


संबंधित बातम्या

आमदार रमेश कदम यांची 135 कोटींची संपत्ती जप्त करा : कोर्ट

अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार, 3700 पानी पुरावे दिल्याचा लक्ष्मण ढोबळेंचा दावा

महामडंळ घोटाळाप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश देणार: सामाजिक न्यायमंत्री

अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची कहाणी…

सीआयडी छळतं, मात्र तरीही कोठडी वाढवा, आमदार रमेश कदम यांची नौटंकी

आमदार रमेश कदम यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

राष्ट्रवादीचे फरार आमदार रमेश कदम यांना ग्रँण्ड ह्यात हॉटेलमधून अटक!

राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम फरार, पोलिसांची नाकाबंदी, कार्यकर्त्यांची आतषबाजी

पोलिस स्टेशनवर दगडफेक: राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदमांची कोल्हापूर कारागृहात रवानगी

सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या आ. रमेश कदमांच्या अटकेनंतर कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशनवर दगडफेक 

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अजित पवारही अडकू शकतात : दिलीप कांबळे

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा: आकृती डेव्हलपर्सचे मालकांना अटक

महामडंळ घोटाळाप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश देणार: सामाजिक न्यायमंत्री

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामडंळाचे 80 कोटी गायब, 14 जण निलंबित