मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. उद्यापासून (9 मे 2025) मेट्रो तीन चा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत (BKC to Acharya Atre Chowk) हा मार्ग खुला होणार आहे. उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे.  यावेळी बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मुख्यमंत्री मेट्रोने प्रवास करणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

Continues below advertisement

मेट्रो तीन चा दुसरा टप्पा उद्या खुला होणार असल्यानं यामुळं प्रवशांना दिलासा मिळणार आहे. उद्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत मार्ग खुला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सीएमआरएस पथकाने तीन ते चार दिवस या मार्गाची तपासणी केली होती. आयुक्तांकडून प्रमाणपत्र मिळताच ही मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता उद्यापासून मेट्रो तीन चा दुसरा टप्पा बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत  हा मार्ग खुला होणार आहे. यामुळं मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. कमी वेळात बीकेसी ते आचार्य अत्रे चौकार्यंत जाता येणार आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Mumbai Metro 7A Train: गुंदवली ते विमानतळ मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा, बोगद्यातून 'दिशा' बाहेर पडताच टाळ्यांचा कडकडाट, मेट्रो 7 कशी असेल?