मुंबई : राजधानी मुंबईत राहणाऱ्या, जगणाऱ्या चाकरमान्यांची जीवनवाहिनी म्हणजे मुंबईची लोकल. त्याचसोबत मुंबई नगरीत राहणाऱ्या मुंबईकरांची (Mumbai) जीवनवाहिनी लालपरी, आवडीची डबल डेकर बस म्हणजे बेस्ट. आपली बेस्ट बस पकडण्यासाठी मुंबईकर कधी सीएसटी परिसरात धावतो, कधी मंत्रालयाजवळ रांगेत उभा राहतो. कधी मरीन ड्राईव्हवर वाट पाहतो, तर कधी चर्चगेटच्या गर्दीतून पुढे जातो. कमी पैशात आरामदायी सफर देणारी मुंबईकरांची बेस्ट (Best) बस आता गुगल मॅपवर प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. म्हणजेच, आता लोकल रेल्वेप्रमाणेच बेस्ट प्रवाशांना देखील बसचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे. त्यामुळे, आपल्याला पकडायची बस नेमकं कुठे आहे, किती वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल हे एका क्लिकवर प्रवाशांना समजेल.

Continues below advertisement

7 मे 2025 पासून बेस्ट बसगाड्यांची प्रत्यक्ष माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होणार आहे. बेस्ट उपक्रम सदैव प्रवाशांच्या सुखकर व खात्रीलायक प्रवासाकरीता नवीन आणि अत्याधुनिक उपाययोजना राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. बसगाडीचा प्रवास अधिक अनुकूल व सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे माध्यम उपलब्ध करून देण्याकरिता बेस्ट उपक्रम नेहमीच एक पाऊल अग्रेसर असतो. बेस्ट उपक्रमाची बससेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी त्याचप्रमाणे मुंबई कर प्रवाशांसाठी सोयीस्कर व सुयोग्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने आपल्या बसगाडीच्या प्रवर्तनाबाबतची प्रत्यक्ष (live) माहिती गुगल मॅपसोबत एकत्रित करण्याचे प्रयोजन केले आहे. सदर मॅपवर आजपासून  मुंबईतील बेस्ट बस प्रवासाचे नियोजन करणे खूपच सोपे झाले आहे.  कारण, गुगल आणि बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रम (बेस्ट) यांनी गुगल मॅप्सवर बेस्ट सेवांसाठी प्रत्यक्ष बस माहिती प्रारंभ करण्याची घोषणा केली आहे.

मुंबईकरांचा प्रवास महागणार

मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली असून बस प्रवास आता महाग (Mumbai Best Fare Hike) होणार आहे. बेस्ट बसच्या प्रवासभाड्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ही भाडेवाढ 8 मे पासून लागू करण्यात येणार आहे.  बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनापाठोपाठच परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बेस्टच्या बसभाड्यात या आठवड्यापासून दुप्पट वाढ होणार आहे. बेस्टने किमान भाड्यात दुपटीने वाढ केली आहे. साधारण बसचे किमान भाडे पाच रुपये आहे. त्यात आता वाढ होऊन 10 रुपये प्रस्तावित केले आहे. तर वातानुकुलित बसचे किमान भाडे सहा रुपये आहे ते बारा रुपये करण्यात आले आहे. 

Continues below advertisement

हेही वाचा

रिक्षावर झाड कोसळून 'मुंबईचा डबेवाला' ठार, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र