मुंबई : लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारची जोरदार तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरचं मेट्रो सुरू करण्यासाठी मुंबई मेट्रोकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. आता मेट्रोने प्रवास करण्यासाठी कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. मुंबई मेट्रोने या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. यापुढे मेट्रोमध्ये अजिबात गर्दी दिसणार नाही. सोबतचं आसन व्यवस्था देखली सोशल डिस्टन्स पाळून तयार करण्यात येत आहे.


एकीकडे मुंबईत दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, दुसरीकडे मुंबई सारखी आर्थिक राजधानी असलेले शहर बंद असल्याने राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा सुरळीत चालू करण्यासाठी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहे.


मेट्रोचं नियोजन कसे असणार?




  • लॉकडाऊननंतर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मेट्रो प्रवासातून प्लास्टिक टोकन हद्दपार होणार

  • डिजीटल तिकीट व्यवस्थेवर मेट्रो भर देणार, त्यासंबंधीची तयारी सुरू

  • लॉकडाऊन संपल्यानंतर मुंबई मेट्रो जेव्हा रुळांवर धावेल तेव्हा मेट्रोतून प्रवासाचे नियम बदललेले असतीलं

  • आसनव्यवस्थेतील बदलासोबतच मुंबई मेट्रो तिकीटाचे प्लास्टिक टोकनही बंद करणार.

  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई मेट्रो प्रशासनानं काही बदल करायचे ठरवले आहेत.

  • यात एका रिकाम्या सीटचे अंतर ठेऊन असणारी आसनव्यवस्था अमलात आणली जाईल. तसे स्टिकर्स सध्या मेट्रोच्या सीटस् वर लावले जातायेत.

  • तर, मेट्रोचे तिकीट म्हणून दिले जाणारे प्लास्टिक टोकनही आता बंद होणार आहे.

  • त्याऐवजी पेपर तिकीट, डिजीटल तिकीट, स्मार्ट कार्डचा वापर केला जाऊ शकतो.


लोकलबद्दल निर्णय नाही
मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल रेल्वे सेवेबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. राज्य सरकारने लोकल काही प्रमाणात सुरू करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र, त्याला रेल्वे मंत्रालयाकडून प्रतिसाद आला नाही. दरम्यान, काल बुधवारी लोकल धावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करण्यात आले. मात्र, ही सेवा अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असल्याची माहिती रेल्वेने दिली.





विमानसेवा 25 मे पासून सुरू
देशातील विविध भागात अडकलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. देशांतर्गत विमान वाहतूक येत्या 25 मेपासून सुरु होणार आहे, अशी माहिती हवाई वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी ट्विटरवरून दिली आहे. त्यासाठी सर्व विमानतळे सज्ज ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. प्रवाशांसाठी स्पेशल ऑपरेटिंग प्रोसिजर मंत्रालयाने जारी केली आहे.


Railway Booking | रेल्वे स्थानकावर 2 ते 3 दिवसांत तिकीटविक्री सुरु करण्याचे रेल्वे मंत्र्यांचे संकेत