मुंबई : सुट्ट्या पैशांमुळे होणारे वाद पाहता मुंबई मेट्रोने कॅशलेस व्यवहार सुरु केला आहे. यासाठी मेट्रोने मोबाईल वॉलेट पेटीएमसोबत मिळून प्रवाशांना सिंगल तिकीट देण्याची सुविधा सुरु केली आहे.
मेट्रोच्या प्रवाशांना आता पेटीएम वॉलेटमधून मेट्रोचं तिकीट काढता येणार आहे. मुंबई मेट्रोचा क्यूआर कोड स्कॅन करुन तिकीट शुल्क द्यावं लागेल. त्यानंतर तिकीट काऊंटरकडून टोकण जारी करण्यात येईल.
मेट्रोमध्ये 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. मेट्रो कार्ड किंवा पास काढायचा असल्यास 500 आणि 1000 च्याच बरोबरीत व्यवहार करावा लागतो. मात्र टोकणने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुट्ट्या पैशांअभावी मोठी गैरसोय होते.