'बिभीषण' साकारणारे मुकेश रावल यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला
एबीपी माझा वेब टीम | 16 Nov 2016 06:19 PM (IST)
मुंबई: रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण या मालिकेत बिभीषणाची भूमिका साकारणाऱ्या मुकेश रावल यांचा मृतदेह आढळला आहे. रावल यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने खळबळ उडाली आहे. कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला काल सकाळी साडेनऊच्या सुमारास रावल यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाची स्थिती पाहता हा आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मुकेश रावल हे बँकेतून पैसे काढण्यासाठी घाटकोपरकडे गेले होते, असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. कुटुंबीयांना मुकेश रावल यांचा मृत्यू झाल्याची बातमी आज समजली. मुकेश रावल हे काल घरातून बाहेर गेले, ते परतलेच नाहीत. त्यामुळे चौकशीसाठी कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली, त्यावेळी फोटो दाखवून पोलिसांनी याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली.