मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मेट्रोमध्ये (Ghatkopar Metro) तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. ऐन गर्दीच्या वेळी मेट्रोमध्ये रखडली होती. तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना काही काळ ताटकळत उभे राहावे लागले. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो ट्रेन सेवा तांत्रिक कारणामुळे काही काळासाठी रखडली होती. त्यानंतर आता मेट्रो सेवा सुरु करण्यात आली असली. तरी मेट्रो सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल सुरु आहे. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.


ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल


मुंबईकरांचे ऐन गर्दीच्या वेळी हाल झाले आहेत. घाटकोपर-वर्सोवा ट्रेन सेवेमध्ये सकाळी तांत्रिक बिघाड झाला होता. यावेळी काळी काळासाठी मेट्रो सेवा पूर्णपणे रखडली होती. यावेळी मेट्रो प्रशासनाने तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगितलं. मात्र, काही काळानंतर रखडलेली मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली.


घाटकोपर ते वर्सोवा विलंबाने सुरु


घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा आता सुरु झाली आहे. मात्र, अद्यापही मेट्रो सेवा उशिराने धावत आहे. मेट्रो सेवा उशिराने धावत असल्याने घाटकोपर मेट्रो स्थानकासह घाटकोपर स्थानकारही प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो सेवा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. 


मेट्रो सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने


सकाळी ऑफिस आणि कॉलेज किंवा इतर कामानिमित्त लोकल आणि मेट्रो प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यात अचानक तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो रखडली आणि यामुळे अनेक प्रवाशांची वाताहत झाली. सकाळी मेट्रो काही काळासाठी रखडली होती, त्यामुळे प्रवासी बराच वेळ मेट्रोमध्ये अडकून होते. अनेक प्रवाशांना कार्यालयात पोहोचायला उशिर झाला. 


तांत्रिक बिघाडीचं कारण


अद्यापही मेट्रो सेवा उशिराने धावत आहे. दरम्यान, मेट्रो प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मेट्रो प्रशासनाने सध्या तांत्रिक बिघाडीचं कारण दिलं आहे. मात्र, मेट्रो सेवा उशिराने धावत असल्याने घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे.


पाहा व्हिडीओ : तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर ते Versova मेट्रो ट्रेन बिघडली



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Holi Special Trains : या होळी स्पेशल ट्रेन आणखी काही दिवस धावणार, रेल्वेने वाढवली वेळ; प्रवासासाठी आजच करा नियोजन