Holi Special Trains Extended :महाराष्ट्रासह देशभरात होळीचा (Holi 2024) सण साजरा झाल्यानंतर गावी गेलेले चाकरमानी आता परतीच्या मार्गाला लागले आहेत. सणानंतर सगळेच चाकरमानी मुंबई (Mumbai), दिल्लीला (Delhi)परतत असल्या कारणाने गाड्यांना गर्दी फार वाढली आहे. याच कारणामुळे उत्तर रेल्वेने होळी विशेष गाड्यांच्या सेवेचा कालावधी आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचणं आता सोपं होणार आहे. अतिरिक्त गर्दीला तोंड देण्यासाठी या गाड्या होळीच्या दिवशी चालविण्यात आल्या. ज्या होळी स्पेशल गाड्या वाढवण्यात आल्या आहेत त्यांची संपूर्ण माहिती येथे पाहूयात.

ट्रेन क्रमांकनिर्गमन दिवसविस्तारीत तारीख जुनी तारीख कुठून कुठपर्यंत 
03239गुरुवार 04.04.202431.03.2024राजगीर आनंद विहार (टर्मिनल)
03240शुक्रवार05.04.202401.04.2024आनंद विहार (टर्मिनल)राजगीर
05575शुक्रवार05.04.202401.04.2024सहरसा जंक्शनआनंद विहार
05576शनिवार 06.04.202402.04.2024आनंद विहार (टर्मिनल)सहरसा जंक्शन
05561शुक्रवार05.04.202402.04.2024समस्तीपूर जंक्शनआनंद विहार
05562शनिवार06.04.202403.04.2024आनंद विहारसमस्तीपूर जंक्शन
04095मंगळवार02.04.202430.03.2024पाटना जंक्शननवी दिल्ली 
04073मंगळवार02.04.202431.03.2024गया जंक्शनआनंद विहार 
03639गुरुवार04.04.2024-गया जंक्शनआनंद विहार
03640शुक्रवार04.04.2024-आनंद विहार (टर्मिनल)गया जंक्शन

होळी विशेष गाड्यांच्या सेवेचा कालावधी आणखी वाढवला असल्या कारणाने प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही. तसेच, त्यांचा प्रवासही सुखाचा होईल आणि त्यांच्या इच्छित स्थळीही वेळेत पोहोचता येईल.

महत्त्वाच्या बातम्या :

महायुतीत शिवसेना नाराज? भाजप मित्रपक्षांना संपवतंय, सर्व्हेच्या नावाखाली फसवतंय; शिंदेंच्या माजी मंत्र्याचा हल्लाबोल