मुंबई : कोणतीही पूर्वकल्पना न देता मुंबई मेट्रोच्या तिकीटांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी महागणार आहे.
फक्त परतीच्या प्रवासाच्या टोकन आणि ट्रिप पासच्या दरात अडीच वर्षांनी वाढ केली आहे, असं मुंबई मेट्रोच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
मुंबई मेट्रोने परतीच्या प्रवासाच्या तिकीटात पाच रुपयांनी वाढ केली आहे. 2 ते 5 किमी टप्प्यातील प्रवासाच्या तिकीटात 1 रुपया 66 पैसे, तर 5 ते 8 किमी प्रवासाच्या तिकीटात 3 रुपये 33 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
तर यापूर्वी ट्रिप पासवरील डिस्काऊंट 50 टक्के होता. आता 8 किमीचा एक टप्पा याप्रमाणे पुनर्रचना करण्यात आली आहे.