KGF 2 Movie Editor : कन्नड सुपरस्टार यशचा 'केजीएफ 2' चित्रपट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. 17 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने आतापर्यंत 500 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. मग ते रॉकी भाईची स्टाईल असो वा अ‍ॅक्शन सीन. या चित्रपटाबाबतची एक रंजक गोष्ट म्हणजे हा चित्रपट कुण्या बड्या एडिटरनं नाही तर एका 19 वर्षांच्या मुलानं एडिट केला आहे.  


केजीएफ 2 चित्रपटाचा एडिटर हा केवळ 19 वर्षांचा मुलगा आहे.   उज्जल कुलकर्णी या 19 वर्षीय तरुणाने ब्लॉकबस्टर 'KGF Chapter 2' चित्रपट एडिट केला आहे. विशेष म्हणजे उज्ज्वलने याआधी एकही चित्रपट एडिट केलेला नसून केजीएफ 2 हा त्याचा पहिला चित्रपट आहे.


दिग्दर्शक प्रशांत नील यांनी बिग बजेट चित्रपट एडिट करण्याची जबाबदारी एका 19 वर्षांच्या नवख्या एडिटरकडे सोपवली होती. उज्ज्वलने याआधी शॉर्ट फिल्म आणि युट्युब (YouTube) व्हिडीओ एडिट केले आहेत. त्याने केजीएफ 1 चित्रपटाचे एडिट केलेले व्हिडीओ पाहून दिग्दर्शक नील यांनी त्याचे काम आवडले. त्यानंतर त्यांनी उज्ज्वलला 'केजीएफ 2' चित्रपट एडिट करण्याची ऑफर दिली आणि ही कामगिरी उज्ज्वलने चोख पेलली. याचा परिणाम तुम्हांला चित्रपट बघितल्यावर आलाच असेल.






 


एवढ्या कमी वयात  एवढी मोठी संधी मिळवणे खरोखरच कौतुकास्पद आहे. संपूर्ण चित्रपट शूट झाल्यानंतर, उज्ज्वलने संपूर्ण चित्रपटाचा एक ट्रेलर बनवला आणि दिग्दर्शिक प्रशांत यांना दाखवला. ट्रेलर पाहून प्रशांत इतके प्रभावित झाले की त्यांनी उज्ज्वलला संपूर्ण चित्रपट एडिट करू देण्याचा निर्णय घेतला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha