मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मेट्रो प्रशासनानं आपली मुजोरी कायम ठेवली आहे. एबीपी माझानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मेट्रोचा हा बनाव उघड झाला आहे. मेट्रोच्या तिकीट काऊंटरवर केवळ 500 आणि 1000 चं रिचार्ज केलं जाईल असं सांगण्यात आलं.  आज सकाळी मुंबई मेट्रोकडून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, या आशयाचं निवेदन ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. तसंच स्टेशनवर फलकही लावण्यात आले होते. नागरिकांना आणि प्रवाशांना होणारा नाहक मनस्ताप आणि गैरसोय लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी मेट्रो प्रशासनाला 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले होते.


https://twitter.com/MumMetro/status/796292293078773760

एबीपी माझाच्या प्रतिनिधीने 200 रुपयांचं रिचार्ज मागितल्यावर ते देण्यास मेट्रो कर्मचाऱ्यांनी नकार दिला. तसंच एबीपी माझाच्या प्रतिनिधीला कॅमेरा बंद करण्यास सांगण्यात आलं. कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग डिलीट केल्याशिवाय बाहेर पडता येणार नाही असा दमही देण्यात आला.

पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा काल केली होती. त्यामुळे नागरिकांना आज सुट्ट्या पैशांसाठी मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान नोटा रद्द झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, औषध दुकानं, मेट्रो, विमान, पेट्रोल पंप, टोल बुथ या ठिकाणी 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारल्या जातील असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सरकारच्या निर्देशांनंतरही अनेक ठिकाणी नोटा स्वीकारल्या जात नसल्यानं नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

बँक  आणि पोस्ट ऑफिस

तुमचं खातं असलेल्या कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत 30 डिसेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेने जारी केलेला फॉर्म भरून द्यावा लागेल. केवळ पैसे बदलण्यासाठीच हा फॉर्म भरावा लागेल. तुमच्या खात्यात पैसे भरायचे असतील, तर या फॉर्मची गरज नाही.

पैसे बदलण्यासाठी पॅन कार्ड आणि आधारकार्ड किंवा मान्यताप्राप्त ओळखपत्र सोबत असणं आवश्यक आहे.

समजा तुमच्याकडे 500 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे 10 हजार रुपये असतील, तर त्यापैकी 4000 रुपयेच एका दिवसात बदलून मिळतील. म्हणजे तुमच्याकडच्या 500 रुपयाच्या 8 नोटाच बँकेत/पोस्टातून एका दिवसात बदलून घेता येऊ शकतील. परत दुसऱ्या दिवशी हीच प्रक्रिया असेल.

पण तुम्ही तुमच्या खात्यावर कितीही रक्कम भरू शकता. केवळ बदलून घेण्यासाठीच 4 हजार रुपयांची ही मर्यादा असेल.

10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपये तुम्ही बदलून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये वाढ होईल.

 पैसे बदलण्यासाठी मर्यादा, मात्र अकाऊंटमध्ये भरण्याला नाही

बँकेतून पैसे बदलून घेण्यासाठी मर्यादा आहेत, मात्र तुमच्याकडे 500 किंवा हजार रुपयाच्या कितीही नोटा असतील, तर त्या डिपॉझिट करण्यासाठी किंवा खात्यावर भरण्यासाठी मर्यादा नाही. त्यामुळे तुमच्याकडील सर्व पैसे तुमच्या खात्यावर भरल्यास काहीही अडचण नाही.

खात्यावरुन किती पैसे काढू शकाल?

तुम्ही तुमच्या खात्यावरील दिवसाला 10 हजार रुपये आणि आठवड्याला 20 हजारपर्यंतची रक्कम काढू शकाल. समजा तुम्ही उद्या 8 हजार रुपये काढले, तर तुम्हाला आठवडाभरात 12 हजार रुपयेच काढता येतील. पण प्रत्येकवेळी तुम्हाला दहा हजारची मर्यादा असेल.(त्यामुळे 12 हजार काढायचे असतील तर दहा हजार निघतील, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन हजार काढावे लागतील)

त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा 20 हजार रुपये काढता येतील.

ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल. त्यानंतर कोणतीही मर्यादा नसेल.

प्रत्येक एटीएमवरुन दिवसाला 2 हजार रुपयांची मर्यादा

तुमच्या अकाऊंटवर कितीही रुपये असले तरी एटीएमवरुन तुम्ही दिवसाला एका कार्डवरुन 2 हजार रुपयेच काढू शकाल. 18 नोव्हेंबरपर्यंत ही मर्यादा असेल.त्यानंतर ही मर्यादा 4 हजारपर्यंत वाढवण्यात येईल.

ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल. त्यानंतर कोणतीही मर्यादा नसेल.

संबंधित बातम्या

ज्यांच्याकडे काळा पैसा, त्यांनाच चिंता करण्याची गरज : मुख्यमंत्री

तुमच्या ATM वरुन किती पैसे काढू शकाल?

नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार

500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला

एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी

टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप

आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक

देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प

कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार?

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार?

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द