मुंबई: मुंबईत लवकरच चालक विरहित मेट्रो धावणार आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 प्रकल्पात कम्युनिकेशन बेस्ड टॅक्नॉलॉजीच्या आधारावर मेट्रो धावणार आहे.


यामध्ये अद्ययावत सिग्नल प्रणाली वापरण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो चालवण्यासाठी चालकाची गरज लागत नाही. या तंत्रज्ञानामुळं मेट्रोतील दोन फेऱ्यांमध्ये 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ राखणं शक्य होणार आहे.

याशिवाय मेट्रो-3 चा प्रकल्प संपूर्ण भुयारी असून शहरातला हा अशाप्रकारचा पहिलाचा प्रकल्प असणार आहे. 8 डब्याच्या 31 गाड्या कुलाबा ते सिप्झ मार्गावर धावतील. पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प उभा राहणार असून यामध्ये 5 कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे.