मुंबई : लेखिका शोभा डे यांनी तब्येतीवरुन खिल्ली उडवलेल्या मध्य प्रदेशचे पोलीस दौलतराम जोगावत यांच्यावर काल पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील प्रसिद्ध सर्जन डॉ. लकडावाला यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली.

लेखिका शोभा डे यांनी ट्विटरवरुन दौलतराम यांच्या लठ्ठपणाची खिल्ली उडवल्यानंतर, ते पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. यानंतर दौलतराम यांनी आपलं वजन कमी करण्याचा निर्णय घेऊन, उपचारांसाठी मुंबईत दाखल झाले. त्यांच्यावर सध्या डॉक्टर लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत. काल डॉक्टर लकडावाला आणि त्यांच्या टीमने पहिली शस्त्रक्रिया केली.

डॉक्टर लकडावाला हे दौलतराम यांच्यासोबतच जगातली सर्वात लठ्ठ महिला असलेल्या इमानवरही उपचार करत आहेत.

दौलतराम यांचं सध्या वजन 180 किलो असून, त्यांच्यावर उपचार करुन  80 ते 100 किलोच्या आसपास आणण्याचं डॉक्टरांचं लक्ष्य आहे. दौलतराम यांना यासाठी दीड वर्ष उपचार घ्यावे लागणार आहेत.

संबंधित बातम्या :

शोभा डेंनी खिल्ली उडवलेल्या पोलिसावर मुंबईत शस्त्रक्रिया होणार!