मुंबई : मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. मेट्रो मार्गिका 7 (Dahisar East to Gundavali) आणि मेट्रो मार्गिका 2A (Dahisar East To D N Nagar) या मार्गावर सिस्टम इंटिग्रेशन (System Integration) आणि सेफ्टी ट्रायल्स (Safety Trials) सुरू असल्याने 12 ते 18 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सकाळच्या सेवांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
Metro Red Line Extension Project : लाल मार्गिका विस्तार प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा
ही सुधारणा 'लाल मार्गिका विस्तार' प्रकल्पातील एक निर्णायक पाऊल आहे. अंधेरी (पूर्व) ते मिरा-भाईंदर दरम्यान प्रवासासाठी हे काम अत्यावश्यक असल्याच मेट्रोने म्हटलं आहे. सध्या मार्गिका 7 वर 13 स्थानकांदरम्यान सेवा सुरू असून, लाईन 9 चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. RDSO (Research Design and Standards Organisation) ची तपासणी 23 सप्टेंबर 2025 रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, आता Independent Safety Assessor (ISA) चाचण्या आणि ट्रायल रन (Trial Run) सुरू आहेत.
Mumbai Metro Schedule Adjustment : 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान सकाळच्या वेळेत बदल
या काळात मेट्रो सेवा नेहमीपेक्षा उशिरा सुरू होतील. काही प्रमुख बदल पुढीलप्रमाणे आहेत:
डहाणूकरवाडी (Dahanukarwadi) ते गुंदवली पहिली मेट्रो
सोमवार ते शुक्रवार सकाळी 07:01
शनिवार 07:00
रविवार 07:04 वाजता
डहाणूकरवाडी (Dahanukarwadi) ते अंधेरी पश्चिम
सोमवार ते शुक्रवार सकाळी 07:06
शनिवार 06:58
रविवार 06:59
दहिसर पूर्व (Dahisar East) ते अंधेरी पश्चिम
सोमवार ते शुक्रवार सकाळी 06:58
शनिवार आणि रविवार 07.02
दहिसर पूर्व (Dahisar East) ते गुंदवली
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 06.58
शनिवार 07:06
रविवार 07:01
अंधेरी पश्चिम (Andheri West) ते गुंदवली
सोमवार ते शुक्रवार सकाळी 07:01
शनिवार 07:02
रविवार 07:04
प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना MumbaiOne App, महा मुंबई मेट्रोचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आणि स्थानकांवरील माहिती फलक तपासावेत, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
महा मुंबई मेट्रोने सर्व प्रवाशांचे सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. हे प्रणाली एकत्रीकरण हे मेट्रो मार्गिका 9 च्या पहिल्या टप्प्याच्या कार्यान्वयनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. लवकरच गुंदवली ते मिरा रोड दरम्यान थेट आणि सुसंगत मेट्रो सेवा सुरू होणार असून, पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक जलद (Fast) आणि सोयीस्कर (Convenient) होणार आहे.
ही बातमी वाचा: