jain Muni Political Remark: मुंबईवर हक्क सांगायचा हाच प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे बोलून दाखवत होते. राज ठाकरे यांचे विधान अखेर खरं ठरलं असून मुंबईवर हक्क सांगायचं त्यांचा आता प्रयत्न दिसत आहे, आता तरी मराठी माणसाने जाग व्हावं, असे मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलं आहे. जैन मुनींनी कबुतराला राजकीय पक्षाची घोषणा केली आहे, ही घोषणा करताना बेताल वक्तव्ये सुद्धा करण्यात आली. यानंतर आता मनसेकडून जैन मुनींच्या राजकीय भाषेवर मनसेकडूनही जोरदार प्रहार करण्यात आला. कबूतर आणून द्यायचं आमचं काम नाही, तर जाळ्या काढणं तुमचं काम आहे. सगळ्या जाळ्या काढा आणि कबूतर येतात का पहा. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असा प्रकार आहे. माझ्या घरात चालणार नाही पण दुसऱ्यांच्या घरात केलं पाहिजे, भले जीव गेला तरी चालेल हे कसं काय मान्य करायचं? हे मुनी आहेत आणि अहिंसावादी आहेत ना? मुंबईचा महापौर आम्ही ठरवू, टॅक्स वगैरे आम्ही भरतो, यावर काय उत्तर द्यावं वाटतं नसल्याचे ते म्हणाले.
मुंबईवरील पहिला अधिकार मराठी माणसाचा (Avinash Abhyankar on Jain Munis)
अविनाश अभ्यंकर म्हणाले की, मराठी माणूस हा आपल्या राज्यात उत्तम काम करतो, कर्ज घेऊन पळून जात नाही. आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो असं बोलून मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रयत्न आहे. मुंबई ही 107 हुतात्म्यांनी मिळवली आहे. मुंबईवरील पहिला अधिकार मराठी माणसाचा आहे, पहिले संस्कार मराठी आहेत, त्यामुळे मुंबई मराठी माणसाची आहे. मुंबई ही महाराष्ट्रापासून कशी तोडता येईल, अन्यथा आपले राज्य कसे स्थापन करता येईल हा त्यांचा प्रयास असल्याचा हल्लाबोल अभ्यंकर यांनी केला. ते म्हणाले की, लोढा आता कुठे आहेत? त्याबद्दल कुठलंही भाष्य करत नाहीत. कबुतरांसाठी ते जागा शोधत आहेत का? अहिंसावादींना दिशा दाखवणारी माणसं आहात गायब होऊन चालेल का? त्यांनी लोकांचं प्रबोधन करायचं असतं. अशी वक्तव्य शोभत नाहीत. जास्तीत जास्त लोक प्रबोधनात कसे येतील याकडे त्यांनी पहावं. अहिंसा शिकवणारी माणसं शस्त्र हातात घ्यायची बाता करत असतील तर ते अत्यंत दुर्दैवी गोष्ट असल्याचे ते म्हणाले.
लोढा यांचं काय म्हणणं आहे? (Avinash Abhyankar on Lodha)
मनुष्य प्राणी हा जगला तर इतर प्राणी पक्षी जगतील, निसर्गाने सर्व प्राणी पक्षांची रायची खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. माणूस मेला तरी चालेल पण कबुतर जगली पाहिजे असं ते म्हणाले होते. त्यावर काय भाष्य करणार? त्यांना शोभते का? यावर मुख्यमंत्री यांचे काय म्हणणे आहे? लोढा यांचं काय म्हणणं आहे? अशी विचारणा त्यांनी केली.
त्यांचे डॉक्टर जे असतील त्यांच्याशी चर्चा करावी (Jain Monk Political Remark)
कबुतरामुळे आणि त्यांच्या विष्टेमुळे अनेक प्रकारचे आजार होतात, कदाचित एखादी व्यक्ती मृत्यूची पडू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जे डॉक्टर प्रतिक्रिया देतात ते मूर्ख आहेत असे या मुनींचे म्हणणं आहे. त्यांच्या बुद्धीची मला आता कीव करावीशी वाटते. सगळे डॉक्टर बाजूला काढा, त्यांचे डॉक्टर जे असतील त्यांच्याशी चर्चा करावी. तुम्ही सायन्सला चॅलेंज करायला जाऊ नका कारण धर्म एका ठिकाणी असतो आणि विद्वान एक ठिकाणी असतो, असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या