मुंबई : आईला शिवीगाळ केल्याने एकाने स्वतःच्या धाकट्या भावाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात हत्येचा हा प्रकार घडला आहे.

 
हत्येप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी 42 वर्षीय आरोपी प्रदीप मयेकरला अटक केली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. गुरुवारी ही घटना घडली, त्यानंतर दोन दिवसांनी आरोपीला ठाण्यात बेड्या ठोकण्यात आल्या.

 
आईला शिवीगाळ केल्याने प्रदीपने 33 वर्षीय भाऊ रुपेशला बांबूचे फटके दिले. मात्र डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.