मुंबई : लिफ्ट पडल्यामुळे अपघात झाल्याच्या घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. मात्र लिफ्ट न येताच दरवाजा उघडला, त्यामुळे न पाहताच आत शिरणाऱ्या सुरक्षारक्षकाचा 11 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. मुंबईतील वांद्रे भागात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा उलगडा झाला.
शाळेच्या लिफ्टमध्ये अडकून 4 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

वांद्र्यातील 18 मजली एव्हरेस्ट अपार्टमेंटमध्ये मंगळवारी सकाळी ही घटना घडली होती. इमारतीच्या अकराव्या मजल्यावर लिफ्टचे दरवाजे उघडले गेले, मात्र लिफ्ट आलीच नव्हती. लिफ्टमध्ये चढणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या ही गोष्ट लक्षातच आली नाही आणि तो थेट खाली पडला. राधेश्याम हरिजन यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला.
पिंपरीत लिफ्टमुळे महिलेने जीव गमावला

सुरक्षारक्षकाचं काम करणारे हरिजन सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास अकराव्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरी गाडीची चावी घेण्यासाठी गेले होते. चावी घेतल्यावर लिफ्टची वाट पाहत उभं असताना लिफ्टसाठी दरवाजे उघडले, मात्र या लिफ्टचं केबिन सतराव्या मजल्यावरच थांबून राहिलं होतं.
ठाण्यात लिफ्टमध्ये अडकल्याने चिमुरडीने हात गमावला

लिफ्टचा दरवाजा उघडला म्हणून हरिजन यांनी आजूबाजूला न बघता आत प्रवेश केला आणि ते लिफ्टच्या पोकळीतून खाली पडले. हरिजन यांना लगेच वांद्र्यातील भाभा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.