Mumbai Local Train Updates: पश्चिम रेल्वे मार्गावरील (Western Railway) अंधेरी आणि जोगेश्वरी (Andheri-Jogeshwari) दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल ट्रेनची (Mumbai Local Train) वाहतूक विस्कळीत झाली आहे. जलद मार्गावर हा बिघाड झाला आहे. अप आणि डाऊन फास्ट लाईनवरील सिग्नल यंत्रणेत बिघाड (Signal Failure) झाला आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावरील जलद लोकल रखडल्या आहेत. सकाळीच हा बिघाड झाल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. 



आज सकाळच्या सुमारास हा बिघाड झाला होता. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने जलद वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. काही वेळेतच बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र, सकाळच्या वेळी हा बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या बिघाडाने लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेची लोकल उशिराने धावत आहे. त्याच्या परिणामी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र आहे.