मुंबई : मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange)  नेतृत्वाखालील मराठा मोर्चा (Maratha Morcha) मुंबईच्या वेशीवर  येऊन धडकलाय. सध्या मनोज जरांगे हे वाशीमधील कृषी उत्पन्न बाजार समिती (Vashi APMC)  परिसरात पोहचले असून त्यांच्यासोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत.  काल दुपारी लोणावळ्यातुन सुरु झालेला जरांगेंचा प्रवास पहाटेपर्यंत सुरु होता.सरकारच्या शिष्टमंडळा आणि जरांगेची चर्चा झाली आहे. सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्याकडे जीआर आणि राजपत्र आहे. त्यामुळे मुंबईत येण्यापूर्वीच जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चेतून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमीकेवर ठाम आहे. मात्र  नेमकं रात्री काय झाले? हे जाणून घ्या. 


रात्री नेमकं काय घडलं?


कुणबी प्रमाणपत्र हे वडिलांच्या बाजूच्या नातेवाईकांबरोबर आईच्या बाजूच्या नातेवाईकांना देखील मिळवीत ही मनोज जरांगेंची मागणी आहे.या मागणीबाबत सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात काल पुन्हा चर्चा झाली.कुणबी प्रमाणपत्रे ही वडिलांच्या बाजूच्याच नातेवाईकांना देता येतील अशी सरकारची आतापर्यंतची भुमिका राहिली आहे,   मात्र मनोज जरांगेंच्या नेतृत्वात प्रचंड मोठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन पोहचल्यावर सरकार आधीच्या भुमिकेत बदल करु शकते आणि वडिलांबरोबर आईच्या बाजुच्या नातेवाईकांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर काढला जाऊ शकतो.तसे झाल्यास जरांगे त्यांच आंदोलन मागे घेऊ शकतात.मात्र त्यानंतर अनेक प्रश्न अनुत्तरित राहतील. पहिला प्रश्न हा की जी आर काढून जाहीर केलेले आरक्षण पुढे कायद्याच्या कसोटीवर टिकेल का आणि दुसरा प्रश्न जरांगेंच्या सरसकट आरक्षणाच्या मागणीचे काय होणार?


मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मंत्र्यांची पाठ


मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मंत्र्यांनी पाठ फिरवली  आहे. जरांगेंच्या भेटीसाठी येणाऱ्या शिष्टमंडळात देखील मंत्र्यांचा सहभाग दिसत नाही . मागील तीन शिष्टमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त उपस्थित होते .थोड्याच वेळात सरकारचे शिष्ठमंडळ जरांगेंची भेट घेणार आहे.   आज येणाऱ्या शिष्टमंडळात देखील एकही मंत्री नाही.


मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस


मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय.  कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदारपणे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा सकाळी जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.. त्यामुळे  मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.


हे ही वाचा :


घोडं 'मैदान' जवळ, मराठावीर मनोज जरांगेंचं भगवं वादळ नवी मुंबईत, आंदोलनाचा आजचा दिवस निर्णायक