Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाच्यावतीने रविवारी 12 फेब्रुवारी रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करण्याआधी मध्य रेल्वेच्या या मेगा ब्लॉकबाबत जाणून घ्या
>> विद्याविहार आणि ठाणे दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 11 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे येणार्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
12168 बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस12142 पाटलीपुत्र- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 12294 प्रयागराज- लोकमान्य टिळक टर्मिनस दुरंतो एक्स्प्रेस 11080 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस11061 छाप्रा - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस12164 चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 12162 आग्रा कॅंटॉंमेंट - लोकमान्य टिळक टर्मिनस लष्कर एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
11055 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर गोदान एक्स्प्रेस11061 लोकमान्य टिळक टर्मिनस -जयनगर एक्स्प्रेस 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवानंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस17222 लोकमान्य टिळक टर्मिनस - काकीनाडा एक्स्प्रेस 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी कामायनी एक्स्प्रेस13202 लोकमान्य टिळक टर्मिनस- पटना एक्स्प्रेस12619 लोकमान्य टिळक टर्मिनस -मंगळुरू एक्स्प्रेस
>> हार्बर मार्गावर कुठं असणार मेगा ब्लॉक?
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर (बेलापूर-खारकोपर BSU लाईन वगळून) सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. पनवेल येथून 10.33 ते 15.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.
मेगा ब्लॉकच्या कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावणार आहेत. मेगा ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावणार आहेत. ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.