Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो मध्य रेल्वेकडून रेल्वेकडून रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल, तर घराबाहेर पडण्याआधी लोकल ट्रेनचं वेळापत्रक नक्की पाहा. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान रविवारी ब्लॉक असेल, त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. रविवारी हार्बर मार्गाने प्रवास करणार असाल, वेळापत्रक नक्की पाहा.

Continues below advertisement

रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक

रविवारी 8 डिसेंबर रोजी मेगाब्लॉकमुळे माटुंगा-मुलुंड जलद मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हार्बर मार्गावर सेवा रद्द राहतील. पनवेल - कुर्ला दरम्यान विशेष सेवा सुरू राहतील. मध्य रेल्वेकडून उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंडदरम्यान मेगाब्लॉक

रविवारी मध्य रेल्वेवर माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत चार तासांचा तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Continues below advertisement

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे धिम्या मार्गावर वळवल्या जातील. 
  • तसेच माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि त्यांच्या गंतव्यस्थानावर 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
  • ठाणे पुढील जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. 
  • ठाणे येथून सकाळी 11.25 ते दुपारी 3.27 या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. गंतव्यस्थानावर 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

हार्बर मार्गावरील सीएसएमटीवरून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी सुटणाऱ्या सेवा आणि सीएसएमटीवरून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांदे / गोरेगावसाठी सुटणाऱ्या सेवा रह राहतील. पनवेल / बेलापूर/ वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या आणि गोरेगाव/वांटे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.