घाटकोपरला 'एक्स्प्रेस' बळी :
काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्यं घाटकोपर रेल्वे स्टेशनवरची आहेत. कल्याणवरुन मुंबईला जाणाऱ्या या एक्स्प्रेसला घाटकोपरमध्ये थांबा नव्हता. मात्र तरीही या तरुणानं धावत्या एक्स्प्रेसमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. वेगामुळे त्याला एक्स्प्रेस आणि रुळामधल्या
गॅपमध्ये खेचून घेतलं. यातच या तरुणाचा मृत्यू झाला.
पाहा व्हिडिओ :
कुर्ल्यात हलगर्जी जीवावर बेतली असती :
कुर्ला स्थानकात गेल्या सोमवारी अशीच घटना घडली. मात्र आरपीएफच्या जवानांनी देवदूताप्रमाणे दोघांचे प्राण वाचवले. कुर्ला स्टेशनवर दोन मित्र गप्पांमध्ये व्यस्त होते. त्याचवेळी लोकल फलाटावर आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. घाईघाईनं या दोघांनी लोकल पकडण्याचा प्रयत्न केला.
तेवढ्यात लोकलनं वेग धरल्यानं हे दोघेही बाहेर फेकले गेले. सुदैवानं हे तरुण लोकल आणि रुळामधल्या गॅपमध्ये अडकले नाहीत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पाहा व्हिडिओ :
कुर्ल्यात आत्महत्या :
अलिकडे मुंबईतल्या लोकल स्टेशनवर आत्महत्यांचं प्रमाणही वाढलं आहे. पाच दिवसांपूर्वीच कुर्ला स्टेशनवर एका व्यक्तीनं रुळावर झोपून आत्महत्या केली.
अनेक प्रवाशांप्रमाणे ही व्यक्तीदेखील ट्रेनची वाट पाहत थांबली होती. मात्र ट्रेन जवळ येताच फलाटावरुन त्याने उडी टाकून ट्रेनखाली जीव दिला. अशा दुर्घटनावर कोणत्याही यंत्रणेनं आळा घालणं शक्य नाही. त्यामुळे प्रत्येकानं स्वतःबरोबर इतरांसोबतही अशी दुर्घटना घडणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे.
पाहा व्हिडिओ :