Mumbai News : 15 मे पर्यंत नालेसफाई काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदा एकूण 2 लाख 51 हजार 610 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. परंतु सध्या स्थितीत केवळ सरासरी 36 टक्केच नालेसफाई पूर्ण झाली असल्याचं दिसून येतंय. मुंबई पालिकेची मुदत 7 मार्च रोजी संपुष्टात आल्यानंतर प्रशासक म्हणून पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी 162 कोटी रुपयांची नालेसफाईची कामे मंजूर केली आहेत. त्यामुळे यंदाचा पावसाळा मुंबईकरांची परीक्षा पाहणारा ठरणार का? हा प्रश्न निर्माण होतोय.
आतापर्यंत मुंबईत केवळ 36% नालेसफाई पूर्ण
शहरातील नालेसफाई - 18 टक्के
पुर्व उपनगर - 44 टक्के
पश्चिम उपनगरात - 36 टक्के
एकूण - 36 टक्के नालेसफाई पूर्ण
4 मे पर्यंतच्या आकडेवारी नुसार स्पष्ट
मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम 80 टक्के पूर्ण झाल्याचे 4 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. दरम्यान पालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना आठवड्यातून दोनदा आपल्या हद्दीतील नाल्यांची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पावसाळा जवळ आल्याने बीएमसीने शहरात पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचू नये, यासाठी दरवर्षी मे महिन्यात नाल्यांची साफसफाई आणि खराब रस्ते दुरुस्तीचे काम मनपाकडून सुरू होते. सोबतच अपघात होऊ नये म्हणून तुटलेल्या रस्त्यांचे खड्डेही भरले आहेत. पण आतापर्यंत मुंबईत केवळ 36% नालेसफाई पूर्ण झाल्याने यंदाचा पावसाळा मुंबईकरांची परीक्षा पाहणारा ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- WHO On Covid Death: कोरोनामुळे भारतात 47 लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या दाव्यावर केंद्र सरकारचा आक्षेप
- Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? जाणून घ्या एका क्लिकवर
- Kedarnath : आजपासून केदारनाथ मंदिर भाविकासाठी खुलं, दर्शनासाठी हजारोंची गर्दी