मुंबई : केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी भारतीय रेल्वेवर हायटेक कृपा केली आहे. भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सुरेश प्रभूंनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातील मुख्य म्हणजे एसी लोकल 15 मेपासून सुरु होण्याची चिन्हं आहेत, तर 15 रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा सुरु होणार आहे.

 
मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांमध्ये विविध प्रकल्पांवर झालेली चर्चा

सीएसटी-पनवेल उन्नत रेल्वे मार्ग ( 10 हजार कोटी रुपये), या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा

तयार, भूमिपूजन 15 ऑगस्टला करणार, या प्रकल्पामध्ये रेल्वेलाईन बरोबर रस्ते वाहतूकही असणार

चर्चगेट-विरार उन्नत रेल्वे मार्ग ( 25 हजार कोटी रुपये) दोन टप्प्यांमध्ये बांधला जाणार, विरार - वांद्रे आणि वांद्रे -चर्चगेट असा मार्ग असणार

सिग्नल यंत्रणा 4000 कोटी निधी

- हार्बर रेल्वेच्या सिग्नल व्यवस्थेत बदल करुन आधुनिक करणार

- त्यामुळे दर दोन मिनिटाला हार्बर मार्गावर लोकल ट्रेन धावणार

- MUTP 3 च्या कामाला 15 ऑगस्टपर्यंत सुरुवात होणार

- मुंबईतील 15 रेल्वे स्थानकांवर वाय फायची सुविधा

- मध्य रेल्वेच्या 10 आणि पश्चिम रेल्वेच्या 10 रेल्वे स्थानकांवर एस्कलेटर

- सीएसटी स्थानकाचं नूतनीकरण करणार, यात 7 किल्ले सदृश्य इमारती आणि शिवाजी महाराज पुतळा असणार

- मुंबई आणि दिल्ली दरम्यान Talgo ट्रेन धावणार, त्यामुळे प्रवासाचा 6 तास वेळ वाचणार, जपानी तंत्रज्ञान

- लोकल ट्रेन, बस, टॅक्सी, मोनो, मेट्रो यासाठी सामायिक तिकीट व्यवस्था सुरु करणार, मोबाईलवर वापरता येईल

- हार्बर रेल्वेवर एसी-डीसी परिवर्तन

- जूनपर्यंत हार्बरवरील सर्व गाड्या 12 डब्यांच्या असणार

- एसी लोकल 15 मे पर्यंत सुरु करणार

- 40 स्टेशनचं आधुनिकीकरण करणार, त्यात मॉल, राहण्याची व्यवस्था, वायफाय, एस्कलेटर असणार

- गेली 20 वर्ष जे रेल्वेचे प्रकल्प रखडले आहेत, ते SPV च्या माध्यमातून फास्ट ट्रॅक करणार

- सीएसटी स्थानकाच्या आधुनिकीकरणामध्ये आझाद मैदान मेट्रो स्थानक, चर्चगेट आणि सीएसटी भूमिगत मार्गाने जोडणार

प्रमुख प्रकल्पांची आणि त्या प्रकल्पाच्या प्रगतीची मुंबईतील कार्यक्रमात माहिती प्रभू यांनी दिली. मांटुगा रेल्वे कारखान्याच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरेश प्रभू मुंबईत आले होते. यावेळी प्रभूंच्या हस्ते करीरोडच्या फूट ओव्हर ब्रिजचंही उद्घाटन करण्यात आलं.