मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज (रविवार) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे मध्य रेल्वेवरील मस्जिद स्थानकातील नवीन पुलावर तीन गर्डर बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते भायखळा या धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.30 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. या काळात सीएसएमटी ते भायखळा दरम्यान अप आणि डाऊन मंदगती मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. सीएसएमटीहून कल्याणसाठी धीम्या मार्गावरील शेवटची लोकल सकाळी १०.४० वाजता सुटेल, तर सीएसएमटीकडे येणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल भायखळा स्थानकात सकाळी 9.50ला पोहचेल.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेवरील सीएसएमटी आणि वडाळा मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.30 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. या काळात सीएसएमटी ते वडाळा दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. हार्बर मार्गावर वडाळा ते पनवेल आणि वांद्रे, गोरेगावसाठी दर 10 ते 15 मिनिटांनी लोकल धावणार आहेत. सीएसएमटीहून पनवेलसाठी शेवटची लोकल सकाळी 10.10ला सुटेल, तर पनवेलहून सुटलेली शेवटची लोकल वडाळा स्थानकात सकाळी 9.52 ला येईल.
पश्चिम रेल्वे
ट्रॅक आणि ओव्हरहेडच्या दुरुस्तीसह देखभालीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 11.45 ते पहाटे 3.45 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला होता. माटुंगा रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप जलद आणि पाचव्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र या ब्लॉकचा कोणताही परिणाम पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर झालेला नसून रेल्वेची वाहतूक रविवारी नेहमीप्रमाणे सुरु राहील, असे रेल्वेने कळवले आहे.
मुंबई लोकल : मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Dec 2018 08:25 AM (IST)
ट्रॅक आणि ओव्हरहेडच्या दुरुस्तीसह देखभालीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 11.45 ते पहाटे 3.45 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र या ब्लॉकचा कोणताही परिणाम पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर झालेला नसून रेल्वेची वाहतूक रविवारी नेहमीप्रमाणे सुरु राहील, असे रेल्वेने कळवले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -