मुंबई : मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर आज (रविवार) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅक आणि ओव्हरहेडच्या दुरुस्तीसह देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर तर हार्बरवर पनवेल ते वाशी अप-डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवरही बोरीवली-भाईंदर या दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.
मेगाब्लॉक दरम्यान बहुतांश लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील.
मध्य रेल्वे
मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत घेण्यात येणार आहे.
ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या धिम्या लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यानंतर या लोकल माटुंगा स्थानकाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाकडे पुन्हा धिम्या मार्गावरून धावतील.
हार्बर मार्ग
पनवेल ते वाशी अप-डाऊन मार्गावर सकाळी 11.30 ते ते दुपारी 4.30 पर्यंत मेगाब्लॉक असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बेलापूर, पनवेलदरम्यान अप व डाऊन मार्गावरील लोकल गाडय़ा रद्द करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी आणि वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान विशेष लोकल धावतील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते भाईंदर, अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल उशिराने धावतील. सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत हा ब्लॉक असेल.
ब्लॉकच्या कालावधीत अप धीम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या वसई रोड ते बोरीवली दरम्यान अप जलद मार्गावरुन तर डाऊन जलद मार्गावरील सर्व गाड्या बोरीवली ते वसई रोड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरुन धावतील.