मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज (रविवारी) सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर मेन लाइनच्या अप स्लो मार्गावर ठाणे ते माटुंगा आणि हार्बरवर सीएसटी ते चुनाभट्टी आणि माहीम, तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते भाईंदर या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.


मध्य रेल्वेवर ठाणे ते माटुंगा दरम्यान अप स्लो मार्गावरील वाहतूक अप फास्ट मार्गावरून वळवण्यात येईल. या कालावधीत ठाण्याहून सकाळी 10.58 ते दुपारी 4.19 वाजेपर्यंत लोकल फास्ट मार्गावरून चालवण्यात येतील.

हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि माहीम अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सीएसटी ते वाशी, बेलापूर, पनवेल आणि वांद्रे-अंधेरीसाठी स. 10.44 ते दुपारी 4.13 वाजेपर्यंत वाहतूक बंद असेल.

पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते भाईंदरपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक आहे. या काळात फास्ट लोकल स्लो मार्गावरून चालवल्या जातील.