मुंबई : रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आदिती तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी आदिती यांना कृषी विषयावर भर देण्याचा सल्ला दिला.

आदिती तटकरे यांना शुभेच्छा देऊन शरद पवारांनी मार्गदर्शनही केलं. कृषी या विषयावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला पवारांनी आदिती तटकरेंना दिला.

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान होणाऱ्या आदिती तटकरे या सर्वात तरुण अध्यक्षा ठरल्या आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या त्या पाचव्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत.

रायगडमध्ये शेकापशी राष्ट्रवादीची आघाडी आहे. शेकापचे अस्वाद पाटील रायगड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.