Mumbai Local, वसई : पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे आज (दि.12) अनेक प्रवाशांचे हाल झाले. विरार, नालासोपारा, भाईंदर, मिरा रोड आणि इतर स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. कुटुंबासह प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसलाय.
अंधेरी आणि बोरीवलीदरम्यान चालणाऱ्या काही गाड्या गोरेगावपर्यंतच मर्यादित
रेल्वे प्रशासनाने सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत जलद मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेतला होता. या ब्लॉकदरम्यान, जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गांवर वळवण्यात आल्या होत्या. परिणामी, काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर अंधेरी आणि बोरीवलीदरम्यान चालणाऱ्या काही गाड्या गोरेगावपर्यंतच मर्यादित होत्या.
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात असुविधा सहन करावी लागली. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. गाड्या रद्द झाल्याने प्रवाशी, तसेच कुटुंबीयांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती.
आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉकमुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. विरार, नालासोपारा, भाईंदर, मिरा रोड आणि इतर स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. कुटुंबासह प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसला.
रेल्वे प्रशासनाने सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १० वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत जलद मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेतला होता. या ब्लॉकदरम्यान, जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गांवर वळवण्यात आल्या होत्या. परिणामी, काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर अंधेरी आणि बोरीवलीदरम्यान चालणाऱ्या काही गाड्या गोरेगावपर्यंतच मर्यादित होत्या.
मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात असुविधा सहन करावी लागली. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. गाड्या रद्द झाल्याने प्रवाशी, तसेच कुटुंबीयांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या