मुंबई : 'नवसाला पावणारा बाप्पा' अशी ख्याती असलेल्या मुंबईतील 'लालबागचा राजा' (Lalbaugcha Raja) च्या दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागते. गणेशोत्सवाची (Ganeshostav 2022) चाहूल लागली की लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांमध्ये पाद्यपूजनाच्या सोहळ्याचे वेध लागतात. लालबागच्या राजाची मूर्ती बाहेरून न आणता या ठिकाणीच घडवली जाते. त्याच्या पाद्यपूजनाच्या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते. त्यामुळे लालबागचा राजा कार्यकर्त्यांमध्ये या सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे.
शनिवारी लालबागचा राजा गणपतीचे आज पाद्यपूजन सोहळा पार पडला. खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे. सकाळी 11 ते रात्री 10 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय लालबागचा राजा गणपती उत्सवाचे हे 89 वे वर्षे आहे. सकाळी दहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
मागील दोन वर्षापासून गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचे (Coronavirus) निर्बंध असल्याने लालबागचा दर्शन हजारो लाखो भाविकांना प्रत्यक्षात घेता आला नाही. मात्र यावर्षी निर्बंध मुक्त गणेश उत्सव साजरा करता येतोय, त्यामुळे एक वेळा उत्साह या लालबाग परिसरात या वर्षी पाहायला मिळतोय लालबाग राजा पाद्य पूजन सोहळा लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर, यु ट्यूब वर ऑनलाइन पाहायला मिळणार आहे. लाखो भाविक लालबागच्या राजाची वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा आपलं 89 वा गणेशोत्सव सोहळा साजरा करणार आहे. यंदा मंडळातर्फे बुधवारी म्हणजेच, 31 ऑगस्ट 2022 ते रविवार 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा होणार आहे. आज सकाळी ठिक दहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला.