लोकलमधून मंगळसूत्र खेचून चोरट्या महिलेची रुळांवर उडी
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2018 11:44 AM (IST)
कल्याणला जाणारी लोकल विक्रोळी स्थानकात थांबली होती, त्यावेळी चोरट्या महिलेने लोकलमधील प्रवासी महिलेचं मंगळसूत्र चोरलं आणि थेट ट्रॅकवर लांब उडी मारली.
मुंबई : लोकलमध्ये मंगळसूत्र चोरल्यानंतर रुळांवर उडी मारणाऱ्या महिलेचा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीता सोनवानी या महिलेला मुंबईतील कुर्ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-कल्याण लोकलमध्ये गेल्या शनिवारी ही घटना घडली. कल्याणला जाणारी लोकल विक्रोळी स्थानकात थांबली होती, त्यावेळी चोरट्या महिलेने लोकलमधील प्रवासी महिलेचं मंगळसूत्र चोरलं आणि थेट ट्रॅकवर लांब उडी मारली. कल्याणहून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या लोकलचा विचार न करता महिलेने रेल्वे रुळांवर उडी मारली आणि तिथून पळत ती थेट फलाटावर चढली. त्यानंतर तिने स्टेशनबाहेर पळ काढला. सुदैवाने त्यावेळी कोणतीही लोकल न आल्याने पुढचा अनर्थ टळला. सीसीटीव्ही फुटेज तपासून कुर्ला पोलिसांनी कारवाई केली. आरोपी सीता सोनवानीला कळवा येथून अटक करण्यात आली. पाहा व्हिडिओ :