मुंबई : विरार-चर्चगेट लोकल ट्रेनमध्ये सहसा पुरुषांची दादागिरी दिसतेच, पण यामध्ये महिलाही मागे नाहीत. पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार-चर्चगेट लोकलमध्ये दरवाजावर उभं राहण्यावरुन महिलांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर तीन महिलांनी एका महिलेला मारहाण केलीच, पण तिच्या हाताला चावाही घेतला.


प्रभा प्रभुदेवा ही महिला नालासोपारा स्टेशनवरुन सकाळी 7.31च्या चर्चगेट लोकलमध्ये चढली. यावेळी दरवाजात उभं राहण्यावरुन लोकलमधील तीन महिलांशी त्यांचा वाद झाला. यानंतर तिन्ही महिलांनी प्रभा यांना मारहाण केली. एवढंच नाही तर त्यांच्या हाताला चावा घेतला.

यानंतर प्रभा प्रभुदेवा यांनी तिन्ही महिलांना भाईंदर स्टेशनवर उतरवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. वसई रेल्वे पोलिसांनी या तिन्ही महिलांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान प्रभा प्रभुदेवा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ