लोकलखाली ढकलून प्रवाशाच्या हत्येप्रकरणी महिलेला अटक
एबीपी माझा वेब टीम | 24 Apr 2018 06:48 PM (IST)
मुंबईतील मुलुंड रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला लोकलखाली ढकलल्याच्या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी मनिषा ललित खाकडिया या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : मुंबईतील मुलुंड रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला लोकलखाली ढकलल्याच्या प्रकरणात पहिली अटक झाली आहे. रेल्वे पोलिसांनी मनिषा ललित खाकडिया या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. दीपक पटवा हे शनिवारी दुपारी मुलुंड स्टेशनच्या फलाट क्रमांक 3 वरुन प्रवास करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एका महिलेला त्यांचा धक्का लागला. तिच्यासोबत बाचाबाची सुरु असताना एक जण मध्ये पडला आणि दीपक यांचे त्याच्यासोबतही खटके उडाली.