Mumbai Kishori Pednekar on Narayan Rane :  महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी नारायण राणेंनी( Narayan Rane) दिशा सालियन संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार टीका केली आहे. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, दिशा सालियनबद्दल राणेंनी (Narayan Rane) काढलेल्या उद्गारामुळं मुंबईची महापौर आणि एक महिला म्हणून व्यथित झाले. दिशा सालियनच्या पोस्टमार्टम रिपोर्ट खोटं ठरवण्याचं काम नारायण राणेंनी केलं आहे. तिच्या वडिलांनी हात जोडून सर्वांना विनंती केली होती. पोस्टमार्टममध्ये असलेल्या गोष्टी खऱ्या आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र तिच्या चारित्र्याचं हनन होत आहे. महिला आयोगाला विनंती आहे की, या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करा. भाजपच्या महिला नेत्यांनाही विनंती आहे की महिला म्हणून या प्रकरणात लक्ष घाला. त्या महिलेची मृत्यूनंतरही बदनामी सुरु आहे. भाजपकडून वारंवार महिलांची बदनामी होत आहे, असं महापौर म्हणाल्या. 


महापौर म्हणाल्या की, ही केस सीबीआयकडे केस दिली होती, त्यात काय झालं होतं हे आम्हालाही सांगावं. ज्या पद्धतीनं त्या मुलीचा मृत्यू झाला आहे ते वाईटच आहे. त्यांची मृत्यूनंतर बदनामी त्याहून वाईट आहे. सर्वपक्षीय महिलांनी याबाबत आवाज उठवायला हवा. महिलांच्या इज्जतीला जराही महत्व देत नाहीत. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, नाईक कुटुंबिय टाळो फोडून न्याय मागत आहेत. त्यांना तो न्याय मिळालेला नाही. किरीट सोमय्यांच्या माध्यमातून तीन पैशांचा तमाशा दाखवला जात आहे. 


काय म्हणाले होते नारायण राणे? 
अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. दिशा सालियनचा 8 जूनला बलात्कार करुन हत्या करण्यात आली. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी म्हटलं होतं की, सांगितले आत्महत्या केली. मात्र, तिने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली असल्याचे राणे म्हणाले. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती ? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला.  सुशांतच्या घरातील सावंत नावाचा मुलगा कुठे गेला? तो अद्याप बेपत्ता आहे. तसेच रॉय म्हणायचा मुलगा होता, तो कुठे गेला, तोही अद्याप गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. तसेच दिशा सालियनच्या घरातील वॉचमन कुठे आहे? तो देखील गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. कोण काहीतरी लपवते, हेच यावरुन स्पष्ट होत असल्याचे राणेंनी यावेळी सांगितले. लपवलेल्या गोष्टी बाहेर याव्यात असेही राणे यावेळी म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या



दिशा सालियनची आत्महत्या नाही तर बलात्कार करुन हत्या; त्यावेळी तिथं कोण मंत्री होता? नारायण राणेंचा सवाल