मुंबई : देशातील सर्वात मोठ्या ग्राऊंड स्टाफ हँडलिंग पुरवणाऱ्या खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या 2100 कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे. याप्रकरणी  शासन दरबारी न्याय मिळत नसल्यानं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावले आहेत.


शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कर्मचाऱ्यांचे कोट्यावधींच्या वेतन निधीत गैरव्यवहार केल्याचा थेट आरोप अंजली दमानिया यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केला आहे.

याप्रकरणी उद्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कंपनीचे उच्चपदस्थ पदाधिकारी कर्मचारी, खासदार विनायक राऊत आणि अंजली दमानिया यांची मातोश्रीवर पुन्हा बैठक होणार आहे.

दरम्यान, शिवसेना प्रणित कामगार सेना आणि अंजली दमानियांमध्ये बाचाबाची झाली. 'मातोश्री'वर सुरु असलेल्या बैठकीत वाद झाला. त्यानंतर त्यांची समजूत काढून त्या पुन्हा बैठकीत सहभागी झाल्या.

बातमीचा व्हिडीओ :