मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येत असलेल्या क्रांती मूक मोर्चाचं लोण मुंबईत येऊन ठेपत आहे. येत्या 31 जानेवारीला मुंबईमध्ये मराठा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये मराठा मोर्चा आयोजकांनी ही घोषणा केली.


कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना तातडीनं फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा अशा प्रमुख मागण्या मराठा क्रांती मोर्चात करण्यात येणार आहेत.

आतापर्यंत जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदनं दिलं आहे. पण मुंबईतल्या मोर्चात थेट राज्यपलांना निवेदन देणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली.

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत मराठा समाजाचा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला आहे. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाचा एल्गार घुमला असून मुंबईत किती गर्दी जमते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.