Mumbai News : मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील कामाठीपुरा भागात भीषण अग्नितांडव सुरु आहे. कामाठीपुरामध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत आहेत. मुंबईतील कामठीपुरा लेन 13 मध्ये आग लागली आहे. अग्निशमन दल आगीच्या घटनास्थळी पोहोचत आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कामाठीपुरा लेन 13 भागात सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत आहेत.


मुंबईत कामाठीपुरामध्ये भीषण आग


मुंबईतील कामठीपुरा परिसरात एक इमारतीला आग लागली. कामठी परिसरातील पठारे इमारतीच्या तिसऱ्या फ्लोअर आग लागली. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत आतापर्यंत 12 जणांना बाहेर काढण्यात यश आलं असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत अद्याप कोणीही जखमी नसल्याची माहिती समोर आली आहे.