Mumbai IIT : मुंबई आयआयटीच्या एमटेक आणि पीएचडी अभ्यासक्रमाच्या फी मध्ये 35 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात आली आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा सर्व पूर्ववत सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षीपासून फी वाढ करण्यात आली असल्याची माहिती आहे. ही वाढ आधीच प्रस्तावित असल्याने या वाढीला प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.


शिवाय, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खर्च हा शिकवणी शुल्कातून मिळणाऱ्या महसुलातून होत असतो. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून ही फी वाढ करण्यात आली आहे, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 


मात्र, आत्ताच कुठे कोरोना परिस्थितीतून बाहेर पडत असताना या महागाईत अशाप्रकारे फी वाढ केल्याने विद्यार्थी याला विरोध करत असून यासंदर्भात ते आयआयटी प्रशासनाची चर्चा करणार आहेत.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI