मुंबईत मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, दोघे जखमी
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2018 08:05 AM (IST)
बोरीवलीतील वीर सावकर उद्यानात मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात 54 वर्षीय पंकज शाह यांचा मृत्यू झाला
मुंबई : मुंबईत मधमाश्यांच्या चाव्यात एकाला प्राण गमवावे लागले, तर दोघं जण जखमी झाले आहेत. बोरीवलीतील वीर सावकर उद्यानात ही घटना घडली. मुंबईत बोरीवली भागात असलेल्या वीर सावरकर उद्यानात मधमाश्यांचे पोळ उठले. मधमाश्यांनी उद्यानात बसलेल्या नागरिकांवर हल्ला चढवला. 27 जूनला सकाळी 10 वाजता ही घटना घडली होती. मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांना बोरीवलीतील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यामध्ये 54 वर्षीय पंकज शहा यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. 32 वर्षीय रामानुज दाद आणि 46 वर्षीय मेरिस्टा रोंगाविल्ला जखमी झाले होते, मात्र उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून सोडून देण्यात आलं आहे.