भिवंडी : भिवंडी शहरात अमलीपदार्थ विक्रीच्या व्यवसायामुळे असंख्य तरुण तरुणी नशेच्या विळख्यात अडकले असतानाच, गांजाची तस्करी करुन विक्रीसाठी आलेल्या चौघांना 16 किलो गांजासह शांतीनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील एक तस्कर मुख्य सूत्रधार असून तो तडीपार असल्याचे समोर आले आहे.
मास्टर उर्फ दिलशान उर्फ सुफीयान शेख (४०), वसी अहमद कमर अन्सारी उर्फ छोटू (२१) नाजीम हाफिज फरहाद अंसारी (४२) असे गजाआड केलेल्या त्रिकुटाचे नाव आहे. तर रिक्षाचालक दिलशाद अली कुरेशी (२८) यालाही अटक केली आहे.
भिवंडी शहरातील तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊन नये म्हणून भिवंडी पोलीस परिमंडळ-दोनच्या वतीने हद्दीतील सर्व पोलिस ठाण्यात दोन महिन्यांपासून नाशमुक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली असून त्यापौकीच एका नागरिकाने पोलीसांना गांजा तस्कर येत असल्याची माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे शांतीनगर पोलीस ठाण्याच्या एका पोलीस पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव व पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या पथकाने अवचितपाडा येथे सकाळच्या सुमाराला सापळा लावला होता.
त्यावेळी एका रिक्षामधून हे त्रिकूट गांजाच्या बॅग घेऊन परिसरात विक्रीसाठी आल्याचे दिसून आले. या तिघांना पाहून पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी रिक्षा सुसाट पळवली. यामुळे पोलिसांनीही त्यांच्यामागे मोटरसायकलने पाठलाग करत त्यांना एक किलोमीटर अंतरावर गाठले. तरीही हे तिघे गांजाचे पाकीट रिक्षामध्येच सोडून पुन्हा पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आधीच सावध असलेल्या पोलिसांनी या तिघांना झडप घालून ताब्यात घेतले आणि त्यांच्या जवळ असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये 16 किलो 150 ग्राम गांजा आढळून आला.
दरम्यान, या त्रिकुटासह रिक्षाचालकाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांच्याकडील काही रोकड, रिक्षा, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक केली आहे. गांजा तस्करी करणारा मुख्य सूत्रधार मास्टर उर्फ दिलशान उर्फ सुफीयान शेख हा तडीपार असल्याचे समोर आल्याने पोलीसही चक्राहून गेले होती.
भिवंडीत तब्बल 16 किलो गांजा जप्त, चार तस्करही गजाआड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jun 2018 08:07 PM (IST)
भिवंडी शहरातील तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊन नये म्हणून भिवंडी पोलीस परिमंडळ-दोनच्या वतीने हद्दीतील सर्व पोलिस ठाण्यात दोन महिन्यांपासून नाशमुक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली असून त्यापौकीच एका नागरिकाने पोलीसांना गांजा तस्कर येत असल्याची माहिती दिली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -