मुंबईत कार कंटेनरला धडकून दोघांचा मृत्यू, तिघे जखमी
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2018 08:24 AM (IST)
मुंबईतील भांडुप उड्डाणपुलावर झालेल्या कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी आहेत
मुंबई : मुंबईतील भांडुप उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडकली. यामध्ये दोघा तरुणांचा मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी आहेत. ठाण्याच्या दिशेने जात असताना होंडा सिटी कारच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. गाडी दुभाजकावरुन दुसऱ्या बाजूला जात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडकली. भांडुप फ्लायओव्हरवर सकाळी 6:30 ते 6:45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. होंडा सिटीमधून पाच तरुण प्रवास करत होते. यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी आहेत. जखमींना जवळच्याच फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 21 वर्षीय महेश आणि 22 वर्षीय चिकू यांचा अपघातात मृत्यू झाला, तर 21 वर्षीय हेमंत शिवगुंडे, 22 वर्षीय अक्षय मोरे आणि निहार कोडे जखमी आहेत.