मुंबई : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघाताच्या (Porsche Car Accident) घटनेनंतर अवघा महाराष्ट्र हळहळला. ती घटना ताजी असताना आता मुंबईतील अंधेरीमध्ये हिट अॅन्ड रनची घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन तरुणांना भरधाव वेगाने जात असलेल्या बोलेरो पिकअपने धडक दिली आहे. या धडकेत एक तरुणांचा जागेवरच मृत्यू तर दुसरा तरुण गंभीर जखमी त्याच्यावर जवळील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पोलिसांनी ड्रायव्हर बदलल्याचा गंभीर आरोप जखमीच्या वडिलांनी केला आहे.
या अपघातानंतर जखमी तरुण अमन यादव यांचे वडील अक्षय कुमार यादव यांनी पोलिसांवर गंभीर आरोप लावला आहे. अक्षय कुमार यादव यांनी पोलिसांवर आरोप लावला आहे पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरला बदलला आहे का? पाच दिवसानंतर आरोपीला अटक केल्यामुळे ब्लड सॅम्पलमध्ये दारूचे सेवन केले आहे की नाही हे कसे माहिती पडणार आहे? असा गंभीर आरोप जखमी तरूणाच्या वडिलांनी केला आहे. बोलेरो पिकप ड्रायव्हर हा संध्याकाळी दारुचे सेवन करतो अशी कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आहे. मात्र पाच दिवसानंतर आरोपीला अटक केल्यामुळे आरोपी हा दारुचे सेवन करून गाडी चालवत होता का? या संदर्भात कशी माहिती मिळेल असा प्रश्न जखमी तरुण अमन यादव यांच्या वडिलांनी उपस्थित केला आहेत.
अंधेरी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने जागेवरच मृत्यू
कॉलेजमध्ये शिकणारे तरुण 29 जून रोजी सकाळी 5:45 सहाच्या सुमारास अंधेरी पंप हाउस परिसरातून पश्चिम द्रुतगती महामार्गावर गुंदावली मेट्रोस्टेशन जवळ पोहचले. मागून भरधाव वेगाने बोलोरो पिकप कारने धडक दिल्यामुळे एक तरुण गंभीर जखमी तर दुसऱ्या तरुणाच्या जागेवरच मृत्यू झाला आहे. विवेक यादव वय 18 वर्षे आणि अमन यादव वय 19 वर्ष असा दोन्ही तरुणांचा नाव आहे. या अपघातात विवेक यादव अंधेरी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने जागेवरच मृत्यू झाला. तर अमन यादव हा तरुण गंभीर जखमी झाला आहे याच्यावर जवळच रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.
कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच अंधेरी पोलिसांनी धाव घेऊन कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी कारचालकाला चार दिवसानंतर अटक केली आहे. अटक आरोपीचे नाव धनंजय राय वय 30 वर्ष असून आरोपी बोलोरो पिकप ट्रान्सपोर्ट गाडी चालवतो. सध्या अंधेरी पोलिसांनी बोलोरो पिकप गाडीला आपल्या ताब्यात घेऊन या संदर्भात अधिक तपास करत आहेत. मात्र या अपघाताचा घटना घडल्यामुळे मुंबईत मोठा संख्या मध्ये मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग करणारे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हे ही वाचा :