मुंबई : चर्चगेटहून ठाणे-डोंबिवली या मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन सुरु करता येईल का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला केला आहे.
सीएसटी ते अंधेरी लोकल अस्तित्वात आहे, मग चर्चगेटहून मध्य रेल्वेवर ट्रेन का धावू शकत नाही, असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे. लोकल अपघात, लोकलवरचा अतिरिक्त ताण यासंदर्भात समीर झवेरी यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणीदरम्यान कोर्टानं हे प्रश्न उपस्थित केले आहेत.
8 डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयातच रेल्वे प्रशासनाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत यावर काही मार्ग निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.