मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, विरोधकांनी देशभरात राळ उठवली आहे. मात्र मोदींच्या या निर्णयाबद्दल देशातील जनतेचं नेमकं मत काय? हे जगप्रसिद्ध सी- व्होटर या संस्थेने जाणून घेतलं आहे.

देशातील 80 टक्के जनता मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाच्या बाजूने आहेत, असा निष्कर्ष सी व्होटरने काढला आहे. देशभरात केलेल्या सर्व्हेनंतर हा निष्कर्ष काढण्यात आला.

असं असलं, तरी नोटबंदीचा निर्णय चांगला आहे मात्र त्यानंतरचं मॅनेजमेंट वाईट होतं, असं मतही अनेकांनी व्यक्त केलं आहे.

विविध उत्पन्न गटातील नागरिक, गाव असो की शहर,  नोटबंदीला बहुतेकांनी समर्थन दिलं आहे. मात्र त्यानंतरच्या असुविधेमुळे अनेकांनी नाराजी वर्तवली आहे.

सी व्होटरने 21 नोव्हेंबरला देशभरातील जवळपास निम्म्या म्हणजे 252 लोकसभा मतदारसंघात हा सर्व्हे केला.

या सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवण्यापूर्वी दोन प्रश्न विचारण्यात आले.

नोटबंदीबाबत तुमचं मत काय? आणि भारताच्या काळ्या पैशाविरोधी लढ्यात होणाऱ्या गैरसोयीबाबत तुमचं काय मत आहे?

सी व्होटरच्या सर्व्हेत विचारलेले काही प्रश्न

 1) नोटबंदीबाबत तुमचं मत काय?

- चांगला निर्णय, अंमलबजावणीही योग्य - 66.30 %

- चांगला निर्णय, पण सदोष अंमलबजावणी - 27.40 %

- चुकीचा निर्णय - 4.80 %



2) नोटबंदीचा सर्वाधिक फटका कुणाला?

-श्रीमंत 44.10 %

- गरीब -  35.90 %

- दोन्हीही - 16.30 %



 

3) नोटबंदीच्या अंमलबजावणीबाबत तुमचं मत काय?

-  उत्तम - 62.90 %

- ठीक - 24 %

-वाईट - 6.90 %

- अत्यंत वाईट - 5.60 %



4) नोटबंदीमुळे व्यक्तीश: तुमच्यावर काय परिणाम झाला?

- काहीही अडचण नाही - 33.83 %

- थोडीशी अडचण, पण सहज उपाय - 37.04 %

- खूप अडचण, पण आम्ही ती सोडवू - 16.52 %

- सोडवता न येणारं संकट - 12.60 %


5) नोटबंदीची योजना अपयशी ठरली?

- सरकार आणखी योग्य नियोजन करु शकलं असतं का?

- होय - 73.50 %

 नाही - 22 %



- गैरसोय झाली तरी त्यातून काही साध्य होईल?

* होय - 84.60%

*नाही- 13.30 %

 6) विरोधकांच्या दबावासमोर झुकत मोदींनी नोटबंदी मागे घेतल्यास काय होईल?

- मोदींचा पाठिंबा कमी होईल - 61.60 %

- मोदींचा पाठिंबा वाढेल - 17.70 %

- काहीही परिणाम होणार नाही - 10.60 %

- माहित नाही/सांगता येत नाही - 10.1 %

7) नोटबंदीमुळे भाजपला आगामी निवडणुकीत फायदा होईल?

- होय - 69.50 %

- नाही - 16.40 %

- माहित नाही/सांगता येत नाही - 14.1 %


8) नोटबंदीमुळे राजकीय पक्षांच्या प्रचार खर्चावर परिणाम होईल? सर्वाधिक परिणाम कोणत्या पक्षावर होईल?

- काँग्रेस - 19 %

-भाजप - 10.40 %

- अन्य - 10.70 %

- माहित नाही/सांगता येत नाही - 43.8 %