मुंबई : गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या जागतिक दर्जाच्या पी1 पॉवर बोट रेसिंगला ब्रेक लागला आहे. मुंबई हायकोर्टाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर उच्चस्तरीय समितीमुळे या स्पर्धेसमोरील अडथळे कायम राहिले आहेत. 3 ते 5 मार्च दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

हायकोर्टानं गिरगाव चौपाटीवरील पाण्यातील तात्पुरत्या जेट्टीला सशर्त परवानगी दिली आहे. मात्र मरिन ड्राईव्हवर स्टेज आणि इतर व्यवस्था उभारण्याची परवानगी हायपॉवर कमिटीनं नाकारली आहे. त्यामुळे हायकोर्टाने दिलासा देऊनही पी 1 पॉवरबोट रेसिंग समोरील अडचणी कायम राहिल्या आहेत.

पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, हेरिटेज कमिटीचे सदस्य यांचा उच्चस्तरीय समितीत समावेश आहे. या कमिटीने मरिन ड्राईव्हवर पी 1 पॉवरबोट रेसिंगसाठी परवानगी नाकारली आहे. मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करणाऱ्या प्रोकॅम इंटरनॅशनल या स्पर्धेचीही आयोजक आहे.

दोन फ्रेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडियावर परवानगी न घेता स्पर्धेचं लॉचिंग केलं होतं. त्यावेळी मुंबई महापालिकेने कारवाई करुन हा कार्यक्रम बंद पाडला होता.