Mumbai Pollution: मुंबईतील ढासळत्या हवेच्या गुणवत्तेवरून (Mumbai Pollution) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) पालिकेची खरडपट्टी काढली आहे. आयुक्तांना रस्त्यावर घेऊन जा तेव्हा तुम्हाला समजेल की नियम पाळले जात नाहीत, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला खडेबोल सुनावले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतल्यावर पालिकेला जाग आल्याची टिप्पणी देखील न्यायालयाने केली आहे. तर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास पालिकेवरच कारवाई करण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांना समन्स बजावलं होतं. त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले होते. न्यायालयाने BMC आयुक्तांना खडेबोल सुनावत म्हटले की, "रस्त्यावर जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की नियम पाळले जात नाहीत." मुंबईतील विमानतळाच्या परिसरासह काही साइट्सवर नियमांचे पालन होत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले असून, जर महापालिकेने वेळेत कारवाई केली नाही तर तिने स्वतःच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे इशारा दिला.
Mumbai Pollution: कामगारांचे आरोग्य आणि मूलभूत अधिकार
उच्च न्यायालयाने बांधकाम स्थळांवरील कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याबाबतच्या नियमांचे पालन न केल्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळावरही नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले, "कामगारांना गंभीर आरोग्याचे धोके आहेत, तुम्ही गरीबांचे आरोग्याचे हक्क पाळत नाहीत. आरोग्य हा मूलभूत अधिकार आहे."
Mumbai Pollution: उच्च न्यायालयाने स्वतः स्थापन केलेली समिती
मुंबईतील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर उपाययोजना करण्यासाठी उच्च न्यायालयाने एक विशेष समिती स्थापन केली आहे, ज्यामध्ये पर्यावरण तज्ञ, आयआयटीचे तज्ज्ञ आणि निवृत्त प्रधान सचिवांचा समावेश आहे. या समितीमार्फत हवेच्या प्रदूषणावर उपाययोजना करण्यात येणार आहेत.
Mumbai Pollution: उद्या पुन्हा सुनावणी
मुंबई उच्च न्यायालयाने उद्या पुन्हा सुनावणी घेण्याचे ठरवले असून, BMC आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने या सुनावणीसाठी तयारी करून उपस्थित राहावे, असे निर्देश दिले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या