Walmik Karad Santosh Deshmukh Death Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh Death Case) आज (23 डिसेंबर) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. यादरम्यान न्यायधीशांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह (Walmik Karad) अन्य आरोपींना एक प्रश्न विचारला. यावेळी न्यायालयात नेमकं काय घडलं, याची माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात 23 वी सुनावणी झाली. मागील सुनावणीत आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता. तसेच संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओ आरोपींच्या वकिलांना दिल्यानंतर सर्व आरोपींवर आज आरोप निश्चित करण्यात आले. (Walmik Karad Santosh Deshmukh Death Case)

वाल्मिक कराड पहिल्यांदाच बोलला, कोर्टात काय काय घडलं? (Walmik Karad Santosh Deshmukh Death Case)

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणीच्या सुनावणीत न्यायाधीशांनी न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. संपूर्ण घटनाक्रम आरोपीला वाचून दाखवत हे तुम्हाला मान्य आहे का?, असा सवाल विचारला. न्यायाधिशांच्या या प्रश्नावर वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचे म्हटले. यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदाच न्यायालयासमोर स्वत:हून आरोप मान्य नसल्याचं बोलला. तसेच मला बोलायचं आहे, असंही वाल्मिक कराड म्हणाला. आता सदर प्रकरणी 8 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. 

Continues below advertisement

उज्वल निकम काय म्हणाले? (Ujjwal Nikam Santosh Deshmukh Case)

विशेष सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले की, आज आरोप निश्चित केले आहेत. खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून संतोष देशमुख यांचा खून केला. पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होईल. आजही आरोपी वकिलांनी या खटल्यात डी फॉर डीले आणि डी फोर डीरेल केले गेले. प्रत्यक्ष पुराव्याचे काम लवकरच सुरू होईल. तीच तीच कारणे न्यायालयात मांडली जात होती. त्यामुळे न्यायालयाने आदेश करावा अशी विनंती केली. खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं उज्वल निकम यांनी सांगितले. 

संतोष देशमुखांची हत्या, नेमकं प्रकरण काय? (Santosh Deshmukh Death Case)

9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली होती. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य ढवळून निघाले होते. सुदर्शन घुले, जयराम चाटे, श्रीकृष्ण आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार या सहा आरोपींनी संतोष देशमुख यांना टाकळी शिवारात नेले. या ठिकाणापासून एका बाजूला सुदर्शन घुलेचे शेत आहे. त्याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केली. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. 15 व्हिडीओ आणि 8 फोटो आरोपीकडे मिळाल्याची नोंद आहे. या व्हीडिओत ते आरोपी प्रत्यक्ष मारताना आणि आनंद साजरा करताना दिसत आहेत. हे फोटो जेव्हा पहिल्यांदा माध्यमांमध्ये आले आणि सोशल मीडियावर आले तेव्हा राज्यात संतापाची लाट उसळली होती. 12 मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली होती. पोलिसांनी न्यायालयात 1800 पानांचे चार्जशीट सादर केले होते. त्यात ही घटना कशी घडली, नेमके कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले? याचे तपशील दिले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते. नंतर अटकसत्र सुरू झाले होते.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:

संबंधित बातमी:

Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार