मुंबई: 'उद्या झाडंच राहिली नाही तर दुसऱ्या ग्रहावर स्थलांतरित व्हावं लागेल.' अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयानं मुंबईत मेट्रोसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरील बंदी कायम ठेवली आहे. विकासकामं करताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणं योग्य नाही. तसं झाल्यास येणारी भावी पिढी ऑक्सिजनअभावी विकलांग जन्माला येऊ शकते. अशी भीतीही उच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे.

मुंबईतल्या मेट्रो - 3 साठी ५ हजार वृक्षतोडीचा प्रस्ताव आल्यानंतर पालिकेनं नेमकी काय प्रक्रिया केली? वृक्ष तोडीची परवानगी देण्याआधी पालिकेनं सर्व्हे केला होता का? याची माहिती पालिकेनं प्रतिज्ञापत्रावर द्यावी. असे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत.

मेट्रो-३ साठी होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करत चर्चगेट रहिवाशी संघटनेनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावरील पुढील सुनावणी २ आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

मुंबईत मेट्रो 3 च्या बॅरिकेट्सना अज्ञातांनी काळं फासलं