मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या. मात्र सत्तास्थापनेसाठी चाललेल्या हालचालीत शिवसेनेला यश मिळत आहे. आणखी एका अपक्ष उमेदवाराने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.


मुंबईच्या प्रभाग क्रमांक 160 मधील उमेदवार किरण लांडगे शिवसेनेला पाठिंबा देणार आहेत. लांडगे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अपक्षांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील जागांची दरीही वाढत आहे.

राज ठाकरेंच्या 'सात'ची 'साथ' शिवसेनेला की भाजपला?


मुंबईच्या अंधेरी (पश्चिम) मधील प्रभाग क्रमांक 62 मधून निवडून आलेले अपक्ष उमेदवार चंगेज मुलतानी यांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. चंगेज यांनीही मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वात चंगेज यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.

चंगेज मुलतानी

दुसरीकडे सुधीर मोरेंसह स्नेहल मोरेंनीही सेनेत प्रवेश केला आहे. घाटकोपरमध्ये शिवसेना उमेदवारांच्या विरोधात माजी शिवसेना विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी बंडखोरी केली होती. बंडखोरी केल्यानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. अपक्ष उभ्या राहिलेल्या त्यांच्या वहिनी स्नेहल मोरे या एक हजार मतांनी निवडून आल्या.

युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण


गोरेगावच्या दिंडोशीतील (प्रभाग क्रमांक 41) अपक्ष नगरसेवक तुळशीराम शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. आतापर्यंत चार नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे सेनेचं संख्याबळ 88 झालं आहे.

मुख्यमंत्र्यांनी दूत पाठवले, आमिषं दाखवली, पण मी शिवसैनिक : सुधीर मोरे


मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यापासून शिवसेना आणि भाजप दोन्हीही पक्ष 114 या मॅजिक फिगरपासून दूर आहेत. भाजपला 82, तर शिवसेनेला 84 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोन्हीही पक्षांनी सत्तेची गणितं जुळवण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईत शिवसेनेला 84 (आता 88), भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7 आणि इतरांना 14 जागा मिळाल्या आहेत. या गणितात काँग्रेसला साहजिकच महत्त्व आहे.

मुंबईत शिवसेनेची आणखी एक जागा वाढणार!


काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेने पावलं टाकण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. मुंबईचा महापौर आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच राहील, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगोदरच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातील आणि त्यानंतर राज्य सरकारच्या पाठिंब्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असाही गर्भित इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

‘समाजवादी पक्षा’चा शिवसेनेला पाठिंबा?


समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत या पक्षाने शिवसेनेला या अगोदर मदत केली आहे. यामुळेच सपाची मदत होऊ शकते, असं शिवसेनेचं गणित आहे.