मुंबई : रायन इंटरनॅशनल स्कूलचे सर्वेसर्वा असलेल्या पिंटो परिवाराची अटकपूर्व जामिनाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. हरियाणा कोर्टात दाद मागण्यासाठी याचिकाकर्त्यांना उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
मात्र ही संधी प्राप्त करण्यासाठी गुरुवारी रात्री 9 वाजेपर्यंत पिंटो कुटुंबीयांना आपले पासपोर्ट मुंबई पोलिस आयुक्तालयात जमा करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. जर पासपोर्ट जमा करण्यात पिंटो कुटुंबीय अपयशी ठरलं तर त्यांना उद्या संध्याकाळपर्यंतची संधी मिळणार नाही, असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे.
रायन इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ऑगस्टिन पिंटो, त्यांच्या पत्नी आणि व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो यांच्यासह त्यांचा मुलगा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रायन पिंटो यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दरम्यान मुंबई हायकोर्टातील याचिकेत पीडित मुलाच्या पालकांकडूनही मध्यस्थ याचिका दाखल करण्यात आली होती. मानवतेच्या दृष्टीकोनातून अटकपूर्व जामीन फेटाळावा, असा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आला. तसंच प्रद्युम्न ठाकूर या मुलाची हत्या ज्या क्रुरतेने करण्यात आली, त्यानुसार ही घटना दुर्मिळात दुर्मिळ या वर्गात मोडते, असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला.
गुरूग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीतील एका मुलाचा निर्दयीपणे खून केला. हत्येआधी या मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली अटकेत असलेल्या आरोपीने दिली आहे. याप्रकरणी गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्यावतीने हायकोर्टात दावा करण्यात आला की, "या प्रकरणी हरियाणा कोर्टाचीही बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाने यासंदर्भातील प्रकरणात तसे निर्देश दिले आहेत, हे सिद्ध करण्याकरता त्यांनाही बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी."
हायकोर्टाने ही विनंती मान्य केली खरी मात्र मुळात हे प्रकरण हरियाणाच्या कोर्टात सुरु आहे. याप्रकरणी एका पालक संघटनेच्यावतीने अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी या अटकपूर्व जामिनाला विरोध करणारी याचिका दाखल करण्याची परवानगी हायकोर्टाकडे मागितली होती मात्र ती फेटाळण्यात आली.
संबंधित बातम्या
रायन ग्रुपच्या पिंटो कुटुंबाला हायकोर्टाचा पुन्हा एक दिवसीय दिलासा
रायन इंटरनॅशनलच्या संचालकांना मुंबई हायकोर्टाचा अंतरिम दिलासा
मुंबईतील रायन स्कूलचीही पोलखोल, गेटसमोर दारुच्या बाटल्या
कर्नाटकच्या पिंटो यांनी मुंबई, दिल्ली कशी काबीज केली?
प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीस
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रायन ग्रुपच्या पिंटो कुटुंबाचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
14 Sep 2017 06:06 PM (IST)
मात्र ही संधी प्राप्त करण्यासाठी गुरुवारी रात्री 9 वाजेपर्यंत पिंटो कुटुंबीयांना आपले पासपोर्ट मुंबई पोलिस आयुक्तालयात जमा करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -